बिग बॉसच्या घरात पक्याभाईची एण्ट्री

23

सामना ऑनलाईन । मुंबई

त्यागराज खाडिलकर, शर्मिष्ठा राऊत यांच्यानंतर बिग बॉसच्या घरात पक्याभाई अर्थात नंदकिशोर चौघुले यांना वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली आहे. हजरजवाबी आणि स्पष्टवक्ता अशी पक्याभाईची ओळख आहे. आता बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत.

आता या पक्याभाईचा हजरजबाबी आणि स्पष्टवक्तेपणा कुणाला पटणार आणि कोणाला पटणार नाही हे बघणे रंजक ठरणार आहे. बिग बॉसविषयी बोलताना ते म्हणाले,‘आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचे आणि घरामध्ये टिकून राहायचे हेच माझे ध्येय असणार आहे’.

आपली प्रतिक्रिया द्या