मोठी बातमी : प्लाझ्मा थेरपी बंद होणार, थेरपी परिणामकारक नसल्याचा निष्कर्ष

कोरोनाच्या उपचारासाठी देशभरात मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे संकेत अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आज (आयसीएमआर) दिले. ही थेरपी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी परिणामकारक नसल्याचा निर्वाळा देताना यामुळे मृत्यू दर रोखण्यात अपयश आले आहे.

त्यामुळे ही थेरपी उपचाराच्या यादीमधून वगळण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आज आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गावा यांनी दिली.

आयसीएमआरतर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरील माहिती देण्यात आली. या अगोदरही प्लाझ्मा थेरपीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत होती. त्यातच आता ही उपचार पद्धती बंद करण्यात येत असताना ‘अँटिसेरा’ ही पद्धत वापरण्याचे संकेत यावेळी आयसीएमआरतर्फे देण्यात आली आहे.

प्लाझ्मा थेरपी बंद करण्याचे संकेत देताना बलराम भार्गावा म्हणाले की, कोरोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझ्मा थेरपी परिणामकारक दिसून येत नसल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

त्यामुळे आयसीएमआरने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ही उपचारपद्धती वगळण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या