आयपीएल २०१८ : केकेआरचं टेन्शन वाढलं, फास्ट बॉलर झाला जखमी !

17

सामना ऑनलाईन । सिडनी

इंडियन प्रिमियर लीग ( आयपीएल) सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढले आहे. या हंगामासाठी टीमने संघात अनेक बदल केले आहेत. कोलकाताच्या टीममध्ये अनेक नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे संघातील मोजक्या अनुभवी खेळाडूंवर मोठी भिस्त असून त्यांनी प्रत्येक मॅच खेळणे आवश्यक आहे.

mitchell-johnson-1

प्रत्येक अनुभवी खेळाडू मोलाचा असतानाच ऑस्ट्रेलियाहून आलेल्या एका बातमीने टीम मॅनेजमेंटची चिंता वाढवली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन जिममध्ये व्यायाम करत असताना जखमी झाला आहे. जॉन्सनच्या डोक्याला १६ टाके पडले आहेत.  यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा सदस्य असलेल्या जॉन्सनला यंदा कोलकाताने खरेदी केले आहे. त्याच्या बॉलिंगवर संघाची मोठी भिस्त आहे. त्यामुळे जॉन्सनची दुखापत हा कोलकातासाठी मोठा धक्का मानला जातोय.

लिन आणि रसेलचीही चिंता

मिचेल जॉन्सन हा जखमी झालेला कोलकात्याच्या तिसरा अनुभवी खेळाडू आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आणि वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर अॅण्ड्रयू रसेल हे देखील काही दिवसांपूर्वी जखमी झाले आहेत. तिरंगी टी-२० मालिकेत जखमी झाल्याने ख्रिस लिनने पाकिस्तान सुपर लीग ( पीएसएल) मधून माघार घेतली होती. तर रसलेलला दुखापतीमुळे पीएसएल स्पर्धा अर्ध्यावर सोडून द्यावी लागली होती.

आपली प्रतिक्रिया द्या