दिल्लीच्या नायब राज्यपालांना दिलासा; ‘बदनामी करणाऱ्या पोस्ट’ हटवा! न्यायालयाचे ‘आप’ला आदेश

vinai kumar saxena pti

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (नायब राज्यपाल) विनय कुमार सक्सेना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सत्ताधारी आम आदमी पक्षाला (आप) सोशल मीडियावरील त्यांच्याविरोधातील कथित बदनामीकारक पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.