शिल्पा शिंदेने पोस्ट केली ‘ती’ लिंक; चाहते झाले नाराज

53
सिझन 11 - भाभीजी घर पे है या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या शिल्पा शिंदे हिने बिग बॉसचा 11 वा सिझन जिंकला.

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस सीझन ११ ची विजेती असलेली शिल्पा शिंदे आता सध्या ‘दे धना धन’ या कॉमेडी शोमध्ये सुनील ग्रोवरसोबत दिसत आहे. शिल्पा वादग्रस्त गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. आता ती चर्चेत आली आहे ती जुन्याच एमएमएसच्या नव्या प्रकरणामुळे. काही दिवसांपूर्वी शिल्पाबाबत एक दावा करण्यात येत होता की, तिचा एमएमएस लिक झाला आहे. या एमएमएस प्रकरणावरून सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. तो व्हिडीओ शिल्पाचा नाही असे म्हणत तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शविला होता.

एमएमएस प्रकरणी स्पष्टीकरण देताना शिल्पाने तो व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. परंतु आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. शिल्पाने या व्हिडीओचा एक स्क्रिनशॉर्ट काढून इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिल्पाने हा फोटो पोस्ट करताना त्याच्यासोबत कॅप्शन दिले आहे की, मला माझ्या एका फॅनने हा व्हिडीओ पाठवला आहे.’ शिल्पाला हा फोटो शेअर करून हे सांगायचे होते की, तिच्या नावाने व्हायरल झालेल्या एमएमएसमधील व्यक्ति ती नसून दुसरीचं कोणीतरी आहे. तसेच शिल्पाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या व्हिडीओची लिंकही पोस्ट केली आहे. परंतु स्वतःला सत्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नात तिने भलतीच लिंक पोस्ट केली आणि ती ट्रोल झाली. शिल्पाच्या या कृत्यामुळे चाहते नाराज झाले असून शिल्पाने विचार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्या पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शिल्पासोबत बिग बॉसमध्ये असलेली हिना खान हिनेही शिल्पाच्या या कृत्यावर आक्षेप घेत ट्विटरवर कमेंट केली आहे. हिनाने लिहिले आहे की, ‘सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे आपण अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे आपल्याला काहीही पोस्ट करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आपलं खरं आयुष्य म्हणजे कोणता रियॅलिटी शो नाही.’ हिनाने तिची ही कमेंट तिचा प्रियकर रॉकी जैसवालच्या ट्विटर पोस्टवर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या