Bigg Boss 14; सलमान खानाने वाढवली फीस, एका आठवड्याचे मागितले 16 कोटी रुपये…

2393

कोरोना संकटामुळे प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ यावर्षी रद्द करण्यात येणार, अशी चर्चा असताना आता एक नवीन बातमी समोर येत आहे. बिग बॉसचा 14 वा सीझन ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सलमान खान या शोला होस्ट करण्यापासून ते स्पर्धकांच्या नावावरून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्येच यंदाच्या सीझनसाठी सलमान खानाने एका आठवड्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये फी मागितली असल्याची बातम्या समोर येत आहे. 2010 पासून सलग 10 वर्षे हा शो होस्ट करीत असलेल्या सलमानने मागील सर्व शोच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक फीची मागणी केली आहे.

मागील सीझनमध्ये सलमानने एका आठवड्यासाठी 13 कोटी रुपये घेतले होते. मात्र शोचे एपिसोड वाढल्याने निर्मात्यांनी सलमानला प्रति एपिसोड अतिरिक्त दोन कोटी रुपये दिले होते. यातच मागील सीझनमध्ये सलमानने एकूण 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र यावेळी सलमान बिग बॉस 14 मध्ये वाढीव फीसह दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने यावेळी प्रत्येक आठवड्यासाठी 16 कोटी फी मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या