सलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन

छोट्या पडद्यावर गाजलेल्या बिग बॉस या शोचा 15वा सिझन लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. पण, यात एक महत्वाचा बदल करण्यात येणार आहे. या भागांचं सूत्रसंचालन करताना सलमान खान दिसणार नाही. त्या ऐवजी एका वेगळ्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

बिग बॉसचा 15वा सिजन 8 ऑगस्टपासून वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सहा आठवडय़ांनी म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सलमान खान यानेच याची माहिती प्रेक्षकांसोबत शेअर केली होती.

यंदाचा सिजन सहा महिन्यांचा असणार आहे. त्यातील पहिल्या सहा आठवडय़ांचे भाग ओटीटीवर चाहत्यांना 24 तास सातही दिवस पाहता येणार आहेत ज्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरामधील प्रत्येक हालचालीवर लक्ष देता येईल.

या वेळी शोमध्ये ‘जनता’ फॅक्टर महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे सहभागी होणाऱया कॉमन मॅनला स्पर्धकांचे स्टे, टास्क, शोमधील त्यांचे अस्तित्व याबाबत निवड करत असामान्य शक्ती मिळणार आहे.

पण, या सिझनचा होस्ट सलमान खान नव्हे तर करण जोहर असणार आहे. ओटीटी सिझनमध्ये प्रेक्षक आणि स्पर्धकांना जोडून ठेवण्याचं काम करणवर सोपवण्यात आलं आहे. करणनेही आपण या वेगळ्या अनुभवासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.


View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

15 ऑक्टोबरपासून मात्र जेव्हा हा सिझन टीव्हीवर प्रसारित होईल, त्या भागांचं सूत्रसंचालन सलमान खानकडे असणार आहे. सलमान गेला काही काळ ज्या पद्धतीने या शोचं सूत्रसंचालन करतो, ते पाहता करणसमोर चांगलंच आव्हान असेल हे निश्चित.

आपली प्रतिक्रिया द्या