मंदना करिमी अडकली लग्नाच्या बंधनात

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री व इराणी मॉडेल मंदना करिमी ही तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्नाच्या बंधनात अडकली आहे. मंदनाने कोणताही गाजावाजा न करता कोर्टात जाऊन लग्न केले असून तीने ट्विटरवरुन ही गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. ‘मी आणि गौरवने आज आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत कोर्टात जाऊन लग्न केले. लवकरच मंदना गुप्ता सेलिब्रेशन सुरु करणार आहे.’ असे तिने ट्विटरवरून शेअर केले. मंदना व गौरव या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. मंदनाचे याआधी मॉडेल ललित तेहरान सोबत लग्न झाले होते. गौरव हा बिझनेसमॅन असून त्याचे व मंदनाचे गेल्या काही वर्षापासून अफेअर होते. मंदना बिग बॉस नऊच्या सिझनमध्ये फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी गौरव फिनाले एपिसोडमध्ये मंदनाला चिअर करायला आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या