‘बिग बॉस ओटीटी 3’ फेम अभिनेत्री सना सुल्तान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना सनाच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. सना सध्या कोणासोबत रिलेशनमध्ये आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. अशातच सनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केले आहे.
सना सुल्तानने Filmymantra ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या रिलेशन मधील स्थितीबाबत तसेच लग्नाबाबत मत मांडले. खरं सांगू, आजकाल बहुतेक नाती तुटतात, नात्यात दुरावा येतो, कारण लोक त्या गोष्टी करुन मोकळे होतात, जे लग्नानंतर केलं पाहिजे. मला वाटतं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं हे ईश्वरालाही मान्य नाही, त्यासाठीच लग्नाची पद्धत आहे. जर तुमचं प्रेम खरं असेल तर तुम्हाला लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवण्याची गरजच नाही. असे स्पष्ट मत यावेळी तिने मांडले.
‘आधी लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचारही कुणी करत नव्हते. त्यामुळेच पूर्वीची लग्न फार काळ टिकायची. जर तुम्ही ठरवलं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणार नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही लग्नानंतर सुखी आयुष्य जगाल. तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही. मला माहीत आहे की, बरेच लोक माझ्या वक्तव्याशी सहमत होणार नाहीत, पण मला खरंच असंच वाटतंय. स्वतःवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं नातं जितकं शुद्ध ठेवाल, तितका देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आता लोक लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवतात, त्यामुळे त्यांची लग्न टिकत नाही, असं सना सुल्तान बोलताना म्हणाली.
दरम्यान सनाने तिच्या आयुष्यातील जोडीदाराबाबतही प्रतिक्रिया दिली. मी लग्न होईपर्यंत माझं रिलेशन सार्वजनिक करणार नाही. मी माझं नातं खाजगी ठेवीन. असे ती म्हणाली. मात्र यावेळी बोलताना तिच्या तोंडून अनेक नकळत अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ती कुणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे, पण तिचा पार्टनर इंडस्ट्रीमधला नाही.