‘बिग बॉस’ पुन्हा येतोय

छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय, पण तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा 17 वा सीझन येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सीझनचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान हाच करणार आहे. याचे प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये सलमान नव्या लुकमध्ये दिसत आहे.

प्रोमोमध्ये सलमान बॉम्बसमोर बसून म्हणतो, ‘‘अरे, हा कसला बॉम्ब? यापेक्षा जास्त स्फोटक सदस्य येतील.’’ यानंतर सलमान चुकीची वायर कापतो आणि स्फोट होतो. बॉम्बस्फोटानंतर आगीतून बाहेर येत सलमान म्हणतो, ‘‘आम्ही तुम्हाला आगीशी खेळवू, धमका घडवू. हा खेळ मन, मेंदू आणि ताकदीचा असेल, पण हा खेळ सगळय़ांसाठीसारखा नसेल! ’’

प्रोमोमध्ये सलमान कधी गुप्तहेराच्या भूमिकेत, तर कधी कव्वाली गायकाच्या लुकमध्ये दिसत आहे.