बिग बॉस फेम अभिनेत्री पडली प्रेमात, 12 वर्षांनी लहान व्यक्तिला डेट करत असल्याची चर्चा

13808

बिग बॉस या रियालिटी टीव्ही शोमध्ये झळकलेली एक अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती सध्या तिच्याहून 12 वर्षांनी लहान असलेल्या एका व्यक्तिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.

gauhar-jaid

ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खान आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौहर खान सध्या एका संगीतकाराच्या मुलाला डेट करत आहे. या संगीतकाराचं नाव इस्माईल दरबार असून त्यांच्या मुलाचं नाव जैद असं आहे. जैद आणि गौहर हे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. पण सोशल मीडियावर ती वरचेवर तिच्या पोस्ट टाकत असते. त्यामुळे तिच्या जैद सोबतच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जैद हा अभिनेता, डान्सर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो. तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गौहरसोबत सेल्फीही शेअर केला होता.

gauhar-jaid-1

जैदपूर्वी गौहर तिचा बिग बॉसमधला सहस्पर्धक कुशाल टंडन याच्यासोबत प्रेमाच्या नात्यात होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. पण, ते आजही चांगले मित्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या