त्याच्या गुप्तांगाने होकार दिला म्हणून मी ते कृत्य केले, पुरुषावर बलात्कार करणाऱ्या महिलेचा अजब दावा

फोटो सौजन्य -wales online

‘तू जरी नाही म्हणत असलास तरी तुझे गुप्तांग हो म्हणतंय’, असं म्हणत एका लठ्ठ महिलेने पुरुषावर बलात्कार केला. इमोजेन ब्रूक (30 वर्षे) असं या महिलेचं नाव आहे. दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या इमोजेनने पीडिताला धरला आणि त्याच्यावर उडी मारली. यानंतर तिने त्याच्यावर बलात्कार केला, 15 मिनिटानंतर इमोजेनला झोप आली ज्यामुळे ती या पुरुषाच्या अंगावरून उठली आणि झोपून गेली. इंग्लंडमधील साऊथॅम्पटन क्राऊन कोर्ट न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगण्यात आले की इमोजेन ही लठ्ठ असल्याने तिच्यापुढे पीडिताचे काहीच चालू शकले नाही. इमोजेनने बळाचा वापर केल्याने बलात्कारानंतर काही काळ हा पीडित तिथेच काही काळ पडून होता.

सरकारी वकील रॉबर्ट ब्रायन यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, ‘इमोजेन हिने पीडितावर शारिरीक संभोगासाठी जबरदस्ती केली होती. या संबंधांसाठी पीडिताची मान्यता नव्हती, हे माहिती असूनही इमोजेनने त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले’ ब्रायन पुढे म्हणाले की ‘समज असा आहे की बलात्कारी हा पुरुष असतो आणि पीडित व्यक्ती ही महिला असते. ही बाब चुकीची आहे.’ युक्तिवादादरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की पीडित पुरुष आणि इमोजेन यांची ऑनलाईन डेटिंग साईटवर ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर इमोजेनने पीडिताला तिच्या घरी बोलावले होते. दोघांनी भरपूर दारू ढोसल्यानंतर दोघांची पावले बेडकडे वळाली होती. पीडिताला झोप आली होती आणि त्याला झोपायचे होते. इमोजेनच्या डोक्यात मात्र भलतेच विचार सुरू होते. संबंध ठेवण्यास नकार देत असल्याने इमोजेनने त्याचे हात धरून त्याला ओढायला सुरूवात केली. तू नाही म्हणतोयस मात्र तुझे गुप्तांग हो म्हटतंय असं म्हणत तिने त्याच्यावर बलात्कार केला. इमोजेन वजनदार असल्याने पीडिताला हलताच आले नव्हते. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र इमोजेनपुढे त्याचे काही चालले नाही.