
सामना ऑनलाई। नवी दिल्ली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओबामा केअरच्या धर्तीवर जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला मोदी केअर नाव देण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत १० कोटी गरीब कुटुंबांना वर्षाला ५ लाख रुपयाचा आरोग्य वीमा देण्यार असल्याचे जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेतील काँग्रेसने पेंशंट प्रॉटेक्शन अँड अफोर्डेबल केअर अॅक्ट नावाने ही आरोग्य सेवा सुरू केली होती. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा यांनी २३ मार्च २०१० साली या योजनेला कायदेशीर मान्यता देत स्वाक्षरी केली होती. या योजने अंतर्गत गरीब अमेरिकी नागरिकांवर उपचार केले जातात. विरोधी पक्षांनी या सेवेला उपहासात्मक नावाने ओबामा केअर संबोधायला सुरुवात केली. त्यानंतर ओबामांनी योजनेला हेच नाव कायम ठेवले.
ही आहे आरोग्य योजना
क्षयरोगाच्या रुग्णांना दर महिना ५०० रूपयांची मदत मिळणार
१ मेडिकल कॉलेज ३ लोकसभा मतदार संघासाठी आणि राज्यासाठी किमान एक कॉलेज
२४ नवी मेडिकल कॉलेज सुरू करणार
५ लाख रूपये कुटुंबासाठी वर्षाला वीमा कवच मिळेल, जगातील सर्वात मोठा सरकारने आर्थिक सहाय्य केलेला आरोग्य कार्यक्रम असेल
आयुष्यमान भारत योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे
नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम १० कोटी गरीब कुटुंबांसाठी लागू करणार, ५० कोटी नागरिकांना फायदा होतील
राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजना हे ३० हजारचं गरीबांना कवच देतं
१२ हजार कोटी या योजनेसाठी देणार
१.५ लाख सेंटर या आरोग्य सुविधा घरापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतील