पिकअपला ओव्हरटेक केल्यानं केली हत्या, 150 जणांवर गुन्हा

सामना ऑनलाईन । पाटणा

रस्त्यानं जाताना पिकअपला ओव्हरटेक केल्यानं झालेल्या वादावादीत एका तरुणाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. बिहारच्या सीतागढीमध्ये झालेल्या या प्रकरणात 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारच्या सिगंहरीया गावातील रुपेश झा हा तरुण आपल्या मित्रांसोबत सीतामढीला निघाला होता. रस्त्यातच पिकअपला ओव्हरटेक करण्यावरून वादावादी झाली. त्यांनतर पिकअप चालकानं आवाज देऊन आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. थोड्याच वेळात तिथं गर्दी झाली आणि त्यांनी या तरुणाला पकडून मारझोड करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तब्बल 150 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रविवारी घडलेल्या या घटनेनं उत्तरेकडील राज्यातील झुंडशाहीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.