अरे बापरे! 4 राज्यात 6 बायका बिहारच्या छोटूची अजब कहाणी

बिहारचा रहिवासी असणाऱ्या छोटू दास याने एक दोन नव्हे तब्बल 6 लग्न केले आहेत. ज्या ठिकाणी कामाला जाईल त्याठिकाणी तो लग्न करायचा. मुल झालं की त्या बायकोला सोडून पळून जायचा. त्याने चिनवेरिया, सुंदरटांड़, रांची, संग्रामपुर, दिल्ली आणि देवघर या ठिकाणी संसार मांडला. छोटू देवघरच्या मां शारदा ऑक्रेस्ट्रा मध्ये संगीत वादक आहे. ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असायचे तेथे छोटू जायचा आणि वेगळाच कार्यक्रम करुन यायचा.

ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा छोटूच्या दुसऱ्या बायकोच्या भावाने छोटूला जमुई रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या महिलेसोबत पकडलं. त्याने लगेच घरच्यांना बोलवून छोटूला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलिसांनी विचारपूस केली असता, छोटूने सांगितलं की त्याची 6 लग्न झालीत आणि त्याला पहिल्या बायकोपासून चार तर दुसऱ्या बायकोपासून दोन मुलं आहेत आणि बाकी बायकांकडूनही मुलं आहेत, हे ऐकूण सर्वांना धक्काच बसला.

छोटू बिहारच्या बांका जिल्हातल्या जावातारी गावात राहतो. सोमवारी छोटूच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ विकास कोलकत्ता येथे जाण्यासाठी जमुई रेल्वे स्टेशन येथे आला होता. तेव्हा त्याला छोटू दुसऱ्याच महिलेबरोबर दिसला. त्याने लगेच घरच्यांना बोलवून छोटूला त्या महिलेसोबत पकडलं. विकास छोटूला पोलीस स्टेशनला घेऊन गेला. तेथे छोटूची दुसरी बायको मंजूची आई कोबिया देवीने पोलिसांना सांगितले की 2018 साली मंजूचं छोटू सोबत लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत. दीड वर्षांआधी मुलं आजारी पडली होती. यावेळी त्यांचे औषध आणतो असं सांगून छोटू गेला तर तो परत आलाच नाही.

छोटूची 4 राज्यात 6 लग्न झाली आहेत, असा आरोप त्याच्या दुसऱ्या बायकोच्या घरच्यांनी केला आहे. पण याप्रकरणी त्यांनी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. जर गुन्हा नोंदवला तर पोलीस याचा तपास करतील, असे पोलिसांनी सांगितले.