बिहार : सेंट्रल जेलमधूनच मिळाले गांजा-सुरे-सीम कार्ड, सारे हैराण

bihar-central-jail

बिहार पोलिसांच्या एका पथकाने मुझ्झफ्फरपूर येथे आज सकाळी छापा टाकला. या छाप्यावेळी पोलिसांच्या हाती गांजा, सीम कार्ड आणि छोटे सुरे हाती लागले आहेत.

नेहमी प्रमाणे हे छापे सुरू होते, त्यावेळी हे साहित्य जप्त करण्यात आले. जेलमध्ये हे साहित्य कसे पोहोचले असा सवाल निर्माण झाला असून त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

या घटनेसंदर्भात मुझ्झफ्फरपूरचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत सिंह यांनी माहिती दिली आहे. जेलमधील व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी छापे घातले जातात. त्याचनुसार मंगळवारी सकाळी शहीद खुदीराम बोस सेंट्रल जेल येथे छापेमारी करण्यात आली आहे.

या छापेमारीवेळी गांजाची 14 पाकिटे, 1 सीम कार्ड आणि 2 लहान आकाराचे सुरे हाती लागले, असेल्याचे सिंह यांनी सांगितले आहे. यानंतर जेल प्रशासनाविरोधात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या