एके 47 ने बायकोवर गोळीबार करून कॉन्स्टेबलची आत्महत्या

1152

बिहारच्या सीतामढीमध्ये एका कॉन्स्टेबलने बायकोवर एके 47 ने 7 गोळ्या झाडून नंतर स्वतः आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या सरकारी रायफलमधून 16 रॉउंड फायर केले. त्यातील 7 गोळ्या त्यांच्या बायकोला लागल्या. सिमरा गावात पोलीस कॉन्स्टेबल चंद्रभूषण प्रसाद पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होते. शनिवारी रात्री त्यांनी पत्नी मधूदेवीवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्या आणि आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

चंद्रभूषण यांना कामावर हजर होण्यासाठी सहकारी रविवारी बोलावण्यास आला, त्यावेळी त्यांचा दरवाज बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला, त्यानंतर घरातील दृश्य बघून त्यांना धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अनील कुमार यांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. चंद्रभूषण सहरसामधीस रहिवासी होते. ते 2015 मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी बायकोची हत्या करून आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या