बिहारच्या सीतामढीमध्ये एका चोराची अनोखी कहाणी समोर आली आहे. हा चोर 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतो. त्याला महागड्या गाड्या आणि विमानाने फिरण्याची हौस एवढेच नाही तर त्याला 10 बायका आणि 6 गर्लफ्रेण्डही आहेत. या चौघांनी दोन वर्षांपूर्वी गाझियाबाद पोलिसांनी अटक केली होती.
दोन वर्षापूर्वी या चोराला गाझियाबादच्या कविनगर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्या चोराची जग्वार कार जप्त केली होती. ही कार त्याच्या पत्नीच्या नावे रजिस्टर्ड आहे. बिहारच्या सीतामढी येथे राहणाऱ्या चोराचे नाव मोहम्मद इरफान उर्फ उजाले असे आहे. त्याच्या नेमक्या बायका किती आहेत त्याची नेमकी संख्या त्यालाही माहित नाही. पोलिसांच्या चौकशीत त्याने 10 बायका आणि 6 प्रेयसी असल्याचे सांगितले. त्याच्या अनेक प्रेयसी अशाही आहेत ज्यांची भेट एकदा झाल्यानंतर पुन्हा कधीच झाली नाही. याबाबत त्याला विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला की, ज्या शहरात तो चोरी करायला जातो, तिथे एखाद्या मुलीसोबत मैत्री करतो. तो म्हणाला, त्याची पहिली पत्नी गावी राहते आणि ती जिल्हा पंचायतची सदस्या आहे. तर दुसरी भोजपुरी सिनेमांची हिरोईन आहे. जगाच्या नजरेत मोहम्मद इरफान भलेही एक चोर आहे. मात्र, त्याच्या गावी त्याला लोक देवमाणूस मानतात.
तो गावाच्या बाहेर चोरी करतो आणि त्याचा मोठा हिस्सा गावाच्या विकासावर खर्च करतो. यावेळी त्याच्या गावातील सर्व रस्ते पक्के झाले आहेत आणि गावात वीजेची लाईन आणली त्याचा सर्व खर्च इरफानने केला आहे. हेच कारण आहे की, इरफानची पत्नी पहिल्याच फटक्यात निर्विवाद जिंकून आली होती. तर दुसरीकडे मोठ्या फरकाने ती निवडणूक जिंकली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कायम मोठ्या चोऱ्या करायचा.
एखाद्या ठिकाणी चोरी करण्यासाठी तो 10 दिवस तिथे थांबायचा. त्यानंतर आलिशान घरांची रेकी करायचा. दरम्यान संधी साधून लाखो कोटींचा माल घेऊन फरार व्हायचा. तो बिहार ते दिल्ली असा प्रवास जग्वार कारने करत असे, पण पुढे तो विमानाने प्रवास करत असे. साधारणपणे, तो जेव्हाही कोणत्याही शहरात गेला, तेव्हा त्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चकचकीत कपडे घालण्याचा शौकीन असलेला हा चोर प्रत्येक शहरात जाणाऱ्या मुलीला मित्र बनवायचा. जोपर्यंत तो त्या शहरात राहत होता तोपर्यंत दोघेही एकत्र राहत होते. तो लोकांना आपली ओळख उद्योगपती आर्यन खन्ना म्हणून सांगत असे.