बिहारमध्ये गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, ३ ठार

69

सामना ऑनलाईन । बेगुसराय

कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय येथील सिमरिया घाटावर आज (शनिवारी) सकाळी पूजेसाठी आणि गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या