लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभांवर बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना तरुणाची विनंती

एका तरुणाने चक्क लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यासाठी तरुणाने चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांना ट्विटरच्या माध्यमातून विनंती केली आहे. मात्र लग्नसमारंभावर बंदी घालण्याचे त्याचे कारण वाचल्यावर सगळेच हैराण झाले. सध्य़ा त्याचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

बिहारमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने नितीशकुमार यादव यांनी 15मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. तसेच लग्न समारंभांना केवळ 20 लोकांची परवानगी दिली आहे. त्यानंतर 25 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवल्याची माहिती नितीशकुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्या ट्विटला एका युजरने रिट्विट करत अजब मागणी करुन साऱ्यांचेच लक्ष वेधले. या युजरने लग्न समारंभांवर बंदी घालण्याची मागणी केली. झालं असं की नितीशकुमार यादव यांनी 13 मे ला एक ट्विट केले होते. त्यावर पंकज कुमार गुप्ता नावाच्या युजरने रिट्विट करत सर लग्नसमारंभांवर बंदी घातली असतीत तर माझ्या प्रेयसीचे 19मे ला होणारे लग्न थांबले असते, त्यासाठी तुमचा मी आयुष्यभर ऋणी राहीन असे लिहीले. या युजरने लग्नसमारंभांना बंदी घालायला अशासाठी सांगितली की त्याच्या प्रेयसीचे लग्न थांबेल.

लग्नावर बंदी घालण्याच्या मागणीचे हे ट्विट बघता बघता प्रचंड व्हायरल झाले. जवळपास 300च्या वर लाईक्स आणि 49 रिट्विट करण्यात आले आहे. त्यानंतर पंकज कुमारच्या या रिट्विटवर एका महिला युजरने ट्विट करत साऱ्यांचेच लक्ष वेधले. त्यात ती म्हणतेय, तू जेव्हा मला सोडून पूजासोबत बोलायला जायचास तेव्हा मिही रडायचे पंकज. आज मी आनंदाने लग्न करतेय तर प्लिज आता तू असं काही करु नकोस. भले मी लग्न कोणासोबत करत असेन पण हृदयात कायम तू असशील. लग्नाला नक्की ये…तुला पाहून मला निरोप घ्यायचाय असे तिने त्यात म्हंटलेय. हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे. याबाबत नक्की काही सांगता येत नाही की रिट्विट करणारी तरुणी त्याची प्रेयसी आहे. असं होऊ शकतं की एखाद्या युजर्सने गंमत म्हणून अशी प्रतिक्रिया दिली असेल. सत्य काहीही असले तरी ज्याप्रकारे नितीशकुमार यांना रिट्वीट केले. त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या