संबित पात्रा यांना पराभूत करणारा उमेदवार पुन्हा चर्चेत, खासदारकीचे 5 वर्षांचे मानधन केले दान

137

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना पराभूत करणारे उमेदवार पिनाकी मिश्र नव्याने चर्चेत आले आहेत. ओदिशामधील पुरीमधून निवडून आलेले बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्र यांनी त्यांचे 5 वर्षांचे मानधन मुख्यमंत्री मदत निधीला दान केले आहे. आपले सर्व मानधान फनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पुरी मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याची विनंती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना केली आहे.

‘फनी’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलेल्या ओडिशा राज्याला सावरण्यासाठी बीजेडीचे नवनिर्वाचित खासदार पिनाकी मिश्र यांनी येत्या 5 वर्षांचा खासदारकीचे मानधन, तसेच सर्व भत्ते आणि बोनस मुख्यमंत्री मदत निधीत दिल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे खासदार म्हणून मिळणारा कोणताही आर्थिक लाभ पिनाकी घेणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे. पिनाकी मिश्र हे पुरीमधून तिन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.  संबित पात्रा यांना कांटे की टक्कर देत पिनाकी मिश्र हे अवघ्या 11 हजार मतांनी निवडून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या