बाईक चालवताना पाहिला व्हिडीओ कॉल; अपघातात बायकोला गमावले

 

बाईक चालवताना व्हिडीओ कॉल उचलणे हे आर्मी जवानाला चांगलेच महागात पडले आहे. बायकोला घरी सोडायला जाणाऱ्या जवानाच्या बाईकला व्हिडीओ कॉलवर बोलताना अपघात झाला. ही घटना बागलकोट येथे घडली.

शेखरैय्या लक्ष्मैया विभुती (३९)असे या आर्मी जवानाचे नाव आहे. सोमवारी काश्मिर बॉर्डरवर ड्युटी साठी जावे लागणार असल्याने हिरमलगाव येथे शेखरैय्या आपल्या बायकोला सोडायला जात होता. बाईक चालवताना आपल्या मुलांचा व्हिडीओ कॉल आल्याने त्याने फोन उचलला. यावेळी रस्त्याकडेला असलेल्या पाईपलाइनवरून बाईक घसरल्याने या जवानाची बायको खाली कोसळली. यावेळी तिच्या मेंदुला जबर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

आई बाबा कधी घरी येणार ही विचारपुस करण्यासाठी मुलांनी कॉल केला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या