31 डिसेंबरपूर्वी करा चारचाकी, दुचाकींची खरेदी, नववर्षात ‘या’ गाड्या होणार महाग

1465

नववर्षानिमित्त तुम्ही नवीन चारचाकी किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा खिसा अधिक रिकामा होण्याची शक्यता आहे. कारण देशातील अनेक बड्या ऑटो कंपन्यांनी चारचाकी ते दुचाकीच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. या नव्या किंमती 1 जानेवारीपासून लागू होणार आहे, त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकी खरेदी करणार असाल तर 31 डिसेंबरपूर्वीच करून घ्या.

हुंडाई –

car
नामवंत कंपनी हुंडाने जानेवारीपासून गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रत्येक मॉडेल आणि फ्लूय व्हेरिएन्ट नुसार या किंमती वाढणार आहेत. अद्याप कंपनीने कोणत्या मॉडेलच्या गाड्यांची किंमत कितीने वाढणार आहे हे सांगितले नाही. मात्र रॉ मटेरियलच्या किंमती वाढल्याने हा गाड्या महाग होणार आहेत.

हिरो –

car1
हिंदुस्थानी लोकांच्या आवडीची दुचाकी कंपनी हिरो देखील आपल्या गाड्यांची किंमती वाढवणार आहे. जानेवारीपासून हिरोच्या दुचाकी आणि स्कूटरच्या किंमती 2000 रुपयांनी वाढणार आहेत. किंमतवाढीमागेल कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही, मात्र नवीन वर्षात ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिकची रक्कम द्यावी लागणार आहे हे नक्की.

टीव्हीएस –

car2
दुचाकींमधील आणखी एक आघाडीची कंपनी टीव्हीएसने दुचाकी आणि स्कूटर्या किंमती नवीन वर्षात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार टीव्हीएस कंपनीने विविध प्रकारच्या मॉडेलच्या किंमतींमध्ये 7500 ते 39000 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्स –

tata
टाटा मोटर्सने यापूर्वीच किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाच्या गाड्यांची किंमती 10 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे अधिकारी मयंक पारीक यांनी किंमती वाढणार असल्याचे संकेत दिले होते.

मारूती –

maruti
हिंदुस्थानची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 पासून चारचाकींच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने मजबुरीने गाड्यांच्याही किंमती वाढवाव्या लागणार असल्याचे कंपनीने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. परंतु अद्याप कंपनीने हे स्पष्ट केलेले नाही की कोणत्या गाडीची किंमत किती वाढणार आहे.

दरम्यान, या कंपन्यांसह महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा मोटर्स आणि मर्सिडीझ बेंझ या कंपन्या देखील आगामी काही दिवसांमध्ये गाड्यांच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या