भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

45

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

लातूर ते नांदेड रोडवर आय.टी.आय. च्या समोर भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

अहमदपूर येथे नांदेड रोडवर सरपंच धाब्याच्या जवळ अनोळखी वाहनाने दुचाकीवरून जात असलेल्या युवकाला धडक दिली. या अपघातामध्ये युवक जागीच ठार झाला. मृत युवकाची ओळख पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या