झरीन खानच्या गाडीने एकाला उडवले, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

22

सामना ऑनलाईन, पणजी

उत्तर गोव्यातील नागोवा-हणजुणे येथे मंगळवारी संध्याकाळी बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान हिच्या गाडीने एका बाईकस्वाराला उडवलं. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हणजुणेचे पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री झरीन आपल्या इनोव्हा कारमधून कळंगुटवरून नागोवा येथे येत असताना हा अपघात झाला.

यू टर्न घेत असताना कारच्या मागून येणाऱ्या दुचाकी चालकाची कारला धडक बसून हा अपघात झाला.अपघातामध्ये नितेश गोराल (वय- 31 वर्ष) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने म्हापसा येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले,मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हणजुणे पोलिसांनी अपघाताची नोंद करून झरीनचा कार चालक अब्बास अली याला अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका केली.

आपली प्रतिक्रिया द्या