दुचाकीस्वाराने महिलेचे हजारो रुपयांचे गंठण पळवले

432

लातूरमध्ये सकाळी 6.25 वाजण्याच्या सुमारास घरासमोरचे झाडत असताना दुचाकीवर आलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळ काढला. सुमारे 86 हजार 750 रुपयांचे गंठण पळवल्याप्रकरणी अज्ञात युवकाविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात शिल्पा बस्वरात बोंद्रे वय 30 रा. सुखशांतीनगर सोमनाथपूर ता. उदगीर यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी ह्या आपल्या घरासमोर सकाळी 6.25 वाजण्याच्या सुमारास झाडत असताना मोटारसायकलवर एक युवक आला आणि त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळून गेला. आरोपीच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट व डोक्याला काळ्या रंगाची टोपी होती. गंठणला हिसकावल्यामुळे त्यांच्या गळ्याला जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केला परंतू लोक जमा होईपर्यंत तो पळून गेला होता. पोलिसांनी अज्ञात युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या