बास्केटबॉल खेळणाऱ्या सशाची गिनिज बुकने घेतली दखल

144

सामना ऑनलाईन। कॅलिफोर्निया

तरुणांना, लहान मुलांना अगदी ज्येष्ठ नागरिकांनाही आपण बास्केटबॉल खेळताना बघतो. पण कॅलिफोर्नियात चक्क एक ससा बास्केटबॉल खेळाडू असून मिनिटाला सातवेळा तो पॉईंट स्कोर करतो. ब‍िनी द बनी असं या ससुल्याच नाव आहे. ससा बास्केटबॉल खेळतो हे जगातल पहिलंच उदाहरण असल्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रिकॉर्डमध्ये या बिनी द बनीची नोंद करण्यात आली आहे. एवढच नाही तर या बनीला सुंदर चित्र काढण्याचीही आवड आहे. बास्केटबॉल खेळताना, चित्र काढताना त्याचा व्हिडिओ सोशल साईटवर लोकप्रिय झाला असून लाखो लोकांनी त्याला लाईक केलं आहे.

हरहुन्नरी बिनी द बनीच्या बास्केटबॉल प्रेमावरून प्राण्यांनाही खेळायची आवड असते हे जगासमोर आलं आहे. योग्य प्रशिक्षण व खुराक दिला तर प्राणीही सर्व खेळ खेळू शकतात असा विश्वास ब‍िनी द बनीचे मालक साई असोर यांनी व्यक्त केला आहे. बिनी द बनी हा क्युट ससा असून खुप हुशार आहे. तो जगप्रसिध्द बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन सारखाच खेळतो असही असोर याने म्हटल आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बिनीला तयार करणार असल्याचही त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या