BIP व्हिडीओ कॉल्समध्ये 10 ऐवजी 15 जण जोडता येणार

झूम, स्काईपप्रमाणे BIP ची सेवा वापरणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बीपने त्यांच्या सेवेत सुधारणा केली असून आता 10 ऐवजी 15 जण ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. हे अॅप तुर्कस्तानच्या अभियंत्यांनी विकसित केले असून ते आतापर्यंत 8.2 कोटी लोकांनी वापरल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. सध्या इतर कंपन्यांच्या एचडी दर्जाच्या ऑडिओ व ग्रुप व्हिडिओ कॉल्समध्ये सहभागी होऊ शकणाऱ्यांची संख्या जितकी आहे त्यापेक्षा दुप्पट लोकं एकत्र कॉलवर जोडली जाऊ शकतील असं बीआयपी कम्युनिकेशन्स टेक्नोलॉजीज आणि डिजिटल सर्व्हिसेसने सांगितलं आहे.

दुसऱ्या ॲप्लिकेशन्सवरून स्विच करणे खूपच सोपे असल्याचं बीआयपी कम्युनिकेशन्स टेक्नोलॉजीज आणि डिजिटल सर्व्हिसेसचे महा-संचालक बुराक अकिंकी यांनी म्हटलंय. बीआयपीचे “ग्रुप मुव्हिंग” फीचर हे जगभरात कोणीही वापरू शकते असं ते म्हणाले. इतर मेसेजिंग ॲपप्सवरील समूह आणि चॅट हिस्टरी सहजपणे बीआयपीवर आणता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. इतर मेसेजिंग अॅपवरील ग्रुप बीपवर आणल्यास त्यातील सदस्य हे आपोआप बीपच्या ग्रुपमध्ये सामील होतात. अशी सुविधाइतर कोणत्याही मेसेजिंग ॲपमध्ये नाही.

आपली प्रतिक्रिया द्या