जन्म महिना सांगतो तुमची प्रेम कहाणी!

सामना ऑनलाईन। मुंबई

जर तुम्ही प्रेमात पडला आहात किंवा पडण्याच्या विचारात आहात तर जरा थांबा. आधी ही माहिती वाचा. म्हणजे तुम्हांला कळेल कशी असेल तुमची प्रेम कहाणी. हे आम्ही नाही तर तुमचा जन्म महिनाच तुम्हांला सांगणार आहे. जाणून घेऊ या याबद्दल.

january-couple

जानेवारी…जर तुम्ही जानेवारीत जन्माला आला असाल तर तुमचे व्यक्तिमत्व नक्कीच आकर्षक असते. ज्यामुळे विरु्ध लिंगी व्यक्ती तुमच्याकडे सहज आकर्षित होतात. प्रेमात तुम्ही बाजी जिंकता. आपले प्रेम व्यक्त करण्याची कुठलीही संधी तुम्ही सोडत नाहीत. यामुळे जोडीदार तुमच्यावर तेवढाच जीव ओवाळून टाकतो. धाडसी वृत्ती तुमच्यात ठासून भरलेली असते. तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती भाग्यवान ठरते.

feb-couple

फेब्रुवारी…या महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्ती नातीगोती सांभाळणाऱ्या असतात. मनाने हळुवार असल्याने जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. या व्यक्ती आदर्श जोडीदाराच्या शोधात असतात. सर्वांची काळजी करणाऱ्या या मंडळींकडे विरु्ध लिंगी व्यक्ती सहज आकर्षित होतात. ही मंडळी जोडीदाराबद्दल पझेसिव्ह असतात. त्यामुळे प्रेमात चढ उतार असतो. पण तरीही प्रेमात तुम्हीच जिंकता.

march-couple

मार्च…मार्च महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाला फार महत्व असते.पण तुमचा हाच स्वभाव तुम्हांला अडचणीत आणू शकतो. तुम्हाला प्रेमाची गरज आहे हे कोणीही सहज ओळखू शकते. यात तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. यामुळे जोडीदार नीट पारखून निवडणे गरजेचे आहे.

april-couple

एप्रिल…एप्रिल महिन्यात जन्माला येणाऱ्या व्यक्ती आकर्षक असतात. या व्यक्तींना सतत दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आनंद मिळत असतो. यामुळे नातेसंबंधावरही त्याचा परिणाम होत असतो. मोजून मापून व गूढ पध्दतीने वागत असल्याने तुमचा स्वभाव कळणे जोडीदारासाठी अवघड असते. पण प्रेमात एकनिष्ठ असतात. हाच गुण तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडे आकर्षित करतो.

may-coupleमे...मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती पटकन प्रेमात पडतात. तुमचे भावनांवर नियंत्रण नसते.पण दिलेला शब्द तुम्ही शेवटपर्यंत पाळता. तुमचा हाच गुण जोडीदाराला आकर्षित करत असतो.जोडीदार तुमच्यासाठी अतिमहत्वाच्या व्यक्तींपैकीच एक असतो. जोडलेली नाती तुम्ही मनापासून निभावता.

june-couple

जून…जूनमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती फारच संवेदनशील असतात.आपल्या जोडीदाराची मनापासून काळजी घेतात.जोडीदाराला खुश करण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रेमाला तुमच्या आयुष्यात फार महत्व असते. यामुळे प्रेमात एकनिष्ठ असता. जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करता. पण त्यातून गैरसमज वाढण्याची शक्यता असते. यामुळे प्रत्येक नात्यात एक स्पेस ठेवून वागलात तर नाती दिर्घकाळ टिकवू शकता.

july-couple

जुलै…या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींच जोडीदाराबरोबर प्रेम व मैत्रीच नात असतं. तुमच्या सहवासात जोडीदाराला सुरक्षित वाटत. पण तरीही तुम्हांला जोडीदाराला अपेक्षित प्रेम व्यक्त करता येत नसल्याने बऱ्याच वेळा नात्यांमध्ये गुंता तयार होतो. पण तो सोडण्यात तुम्ही माहीर असता.ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्याशी एकनिष्ठ असता.

august-couple

ऑगस्ट...ऑगस्ट महिन्यातील व्यक्तींना दुसऱ्यांना प्रभावित करणं विशेष आवडतं.प्रेम व्यक्त करण्यासही तुम्ही मागेपुढे बघत नाही. ज्याच्यावर प्रेम करता त्यालाच आयुष्यसोबती बनवण्याची तुमची धडपड असते. पझेसिव्ह असल्याने जोडीदारावर वचक ठेवण्याकडे कल असतो. जोडीदाराला भेटवस्तू देण्यात तुम्हांला आनंद मिळतो.

sepetmber-couple

सप्टेंबर…सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती वास्तववादी असतात. जोडीदाराप्रती काळजीवाहू असतात.जोडीदाराकडून वारेमाप अपेक्षा ठेवतात. लगेच प्रेम व्यक्त करत नाहीत.ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण हेण्याची शक्यता अधिक असते. जोडीदाराला थेट खुश न करता सीक्रेटली खुश करण्याचा तुमचा प्रयत्न असतो.

october-couple

ऑक्टोबर...ऑक्टोबर महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती भावना व्यक्त करण्यात पुढे असतात.पण तुम्हांला दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे जमत नाही.जोडीदाराकडून वारेमाप अपेक्षा ठेवतात. ज्यामुळे प्रेमसंबंधात कटुता निर्माण होते.प्रेमात पडताना विचार करुनच उत्तर देता.आकर्षक व्यक्तिमत्व असते.

november-couple

नोव्हेंबर…या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्ती एकांतप्रिय असतात. यामुळे लवकर कुठल्याच नात्यात पडत नाहीत. आपण भले नि आपले काम भले असा स्वभाव असतो. स्पेस तुम्हांला जास्त प्रिय आहे. यामुळे स्वत: हून कोणाला प्रपोज करत नाहीत .पण समोरुन कोणी विचारले तर विचार करुन उत्तरे देतात. जोडीदाराला या व्यक्तींशी जुळवून घ्यावे लागते. जर ते जमले तर यांच्यासारखा दुसरा प्रेमळ पार्टनर शोधून सापडणार नाही.

couple-decem

डिसेंबर…महिन्यातील व्यक्ती दिसायला आकर्षक असतात.यामुळे विरुध्द लिंगी व्यक्ती यांच्याकडे सहज वळतात.भावना व्यक्त करण्याची यांची आपली अशी वेगळी स्टाईल असते. जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. चांगले जोडीदार असतात.कुटुंबाला अधिक प्राधान्य देतात.यामुळे यांची प्रेम कहाणी चर्चेचा विषय ठरते.