दिल्लीत भाजपची बैठक संपली, दहा राज्यांच्या उमेदवारांचा फैसला उद्यावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक भाजप मुख्यालयात सुरू असलेली बैठक संपली असून उद्या म्हणजेच बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे दहा राज्यांतील उमेदवारांचा फैसला उद्यावर गेला आहे.

भाजप मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरूण जेटली, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री राजनाथ सिंह व इतर भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, ओडीशा,मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल, हरयाणा अशा दहा राज्यांच्या उमेदवारांवर चर्चा होणार असून तेथील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.