भाजपा-काँग्रेस- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची हाणामारी राडा, भोकरदनमध्ये  शिवसेनेचे नवनाथ दौड यांना धक्काबुकी 

सामना ऑनलाईन । भोकरदन
भोकरदन तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वाढली असून मंगळवारी पंचायत समिती  निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने  तेथील भाजपा कार्यकर्त्यांनी निवडणुक विभागातील अधिकाऱ्यांवर सर्वांत अगोदर आमचे उमेदवारी अर्ज मागे, असे म्हणत सभागृहाचा दरवाजाच बंद केला. त्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांनी हस्तक्षेप केला असता त्यांच्या बाचाबाची होऊन हाणामारी झाली.
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अर्ज मागे घेण्याची मंगळवारी शेवटची तारीख असल्याने येथील नवीन तहसिल कार्यालयात निवडणुक विभागाच्या सभागृहामध्ये दुपारी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची गर्दी जमली होती. मात्र एक वाजणेच्या सुमारास अचानक अर्ज मागे घेण्यासाठी एकाच वेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावयाचे असतील ते अगोदर आमचे अर्ज मागे घ्या, म्हणत गदारोळ केला. तेथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेदवार नवनाथ दौड हे आपल्या आईचा अर्ज मागे घेण्यासाठी तेथे थांबले असता भाजपा कार्यकर्त्यांनी मुद्दामहून हट्ट धरत आमचे अर्ज अगोदर मागे घ्यावीत, अशी दादागिरी करत नवनाथ दौड यांना भाजपा कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
त्यानंतर लगेचच तेथे असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही एेनवेळी आघाडीची बिघाडी झाल्या कारणावरुन गोंधळ माजविला. या दोन्त्यांही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही बाचाबाची व हाणामारी झाली. यामुळे निवडणुक विभागाच्या सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विभागातील अर्ज प्रक्रियेच्या कामकाजाला अडथळा निर्माण झाल्याने तब्बल दोन तास निवडणुक विभागातील कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर तातडीने निवडणुक निर्णय अधिकारी हरीषचंद्र गवळी यांनी पोलीस बंदोबस्त वाढवून घेतला व त्यानंतर पोलीसांच्या मदतीने तब्बल दोन तासांपासून बंद पडलेले कामकाज पुर्ववत सुरु करण्यात आले.
भाजपा कार्यकत्र्यांची कायद्याला मुठमाती- शिवसेना तालुकाप्रमुख दौड
याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा जि.प. उमेदवार नवनाथ दौड म्हणाले, येथील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी दादागिरी वाढली असून आज मंगळवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या इतर पक्षांच्या उमेदवारांना येवून अनेक तास झालेले असतांना येथील भाजपा कार्यकर्त्यांनी अचानक येथून दंडेलशाही करत निवडणुक विभागाच्या सभागृहाचा दरवाजा बंद करुन आमचे अर्ज अगोदर मागे घ्या, अशी दादागिरी केली.  मी, त्यांना असे करु नका, असे म्हणालो असता त्यांनी सरळसरळ माझ्या अंगावर येवून शिवीगाळ करुन मला धक्काबुक्की केली. या भाजपा कार्यकर्त्यांच्या दादागिरीने एक प्रकारे कायद्याला मुठमातीच देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
हाणामारीत इलेक्ट्रॉनिक इन्व्हर्टर व खर्च्यांची तोडफोड
दरम्यान येथील झालेल्या हाणामारीत निवडणुक विभागात निवडणुकीचे कामकाज सुरु असतांना या हाणमारीत संगणक, इलेक्ट्रॉनिक इन्व्हर्टर आणि कार्यालयातील खुर्चांची तोडफोड केल्याने पुढील प्रक्रिया थांबली होती.