भाजपा नगरसेविकेच्या कुटुंबियांमुळे बसचालक दहशतीत

25

सामना प्रतिनिधी । नागपूर

रमना मारोती परिसर, प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका आणि नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे यांच्या मुलाने  शहर बस सेवेच्या एका चालकाला अमानुष मारहाण केली़ आता, नगरसेविकेचे कुटुंबीय दादागिरी करीत असल्याचे सांगत बसचालकांनी भीतीपोटी या भागात बस नेणेच बंद केले आहे़ त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून मनपा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला़.

काही दिवसांपूर्वी रमणा चौकातून बसचालक करनदास किरपान बस घेवून जात होते. त्यावेळी नगरसेविकाचा मुलगा बुलेट या दुचाकी वाहनाने येत होता़ बुलेट बसवर धडकली़ या अपघातात बुलेट बसखाली आली़ यामुळे संतापलेल्या नगरसेविकेच्या मुलाने व पतीने बसचालक करनदासला अमानुष मारहाण केली़ मारहाणीनंतर बस पेटविण्याचाही प्रयत्न केला गेला़ दरम्यान चुक नगरसेविकेच्या मुलाचीच होती़ त्यामुळे आता  नगरसेविकेचे कुटुंबीय जोपर्यत माफी मागणार नाही, तोपर्यंत या भागात बस घेऊन जाणार नाही, अशी भूमिका बस कर्मचारी संघटनेने घेतली आहे़ रमणा मारोती बसस्थानकावरून दररोज शेकडो नागरिक शहर बसमधून प्रवास करतात़ मात्र गेल्या आठ दिवसांपासून या भागातील बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे़ नगरसेविकेचे कुटुंबीय आणि बसचालक यांच्यातील वादामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे  गुरुवारी शहर बसमध्ये बसून रमणा मारोती चौकात गेले़ त्यांनी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेविकेच्या कुटुंबियांच्या भीतीमुळे बसचालक या भागातून बस घेऊन जाण्यास तयार नाहीत़

खुर्च्यांनी केली मारहाण

नगरसेविकाचा मुलगा विरुद्ध दिशेने आला व बसवर धडकला़ यात त्याची बुलेट बसखाली आली़ यामुळे नगरसेविकेच्या मुलाने व पतीने बसचालक करनदास किरपान यांना अमानुष मारहाण केली़ नगरसेविकेच्या कुटुंबियांनी बसचालकाच्या पाठीवर खुर्च्या तोडल्या. या मारहणीत बसचालक किरपानच्या हाताला जबर दुखापत झाल्याचे बससेवा कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

मारहाणीचा आरोप फेटाळला

किरपान उपचाराकरता गावाला गेला आहे. याप्रकरणी नगरसेविकेच्या कुटुंबियांनी माफी मागावी अशी कर्मचाºयांची मागणी आहे़ दुसरीकडे बसचालकाला  मारहाण केल्याचा आरोप नगरसेविकेचा पती व भाजपा पदाधिकारी राजू साकोरे यांनी फेटाळून लावला.

आपली प्रतिक्रिया द्या