भाजप देशात जातीय द्वेषाचे विष पसरवतेय, शरद पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा

देशात बंधुभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. भाजपच्या हाती सत्ता गेल्याने देशात जातीयवादाचे विष वाढत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज भाजपवर केली.

झारखंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकऱयांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींना परदेश दौऱयांसाठी वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वेळ आहे. पण 20 किमी अंतरावर असलेल्या आंदोलन करणाऱया शेतकऱयांची भेट घेण्यासाठी मोदींना वेळ नाही. पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री आहे. पण त्यांच्याविरोधात केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. मोदींच्या हातात सत्ता येऊ नये हे आपण बघितलं पाहिजे, अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

आम्ही थाळी वाजवणारे नाही!

पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थाळी वाजवण्यास सांगितलं. नागरिकांना जागरूक करण्याचं आवाहन केलं. पण आम्ही थाळी वाजवणारे नाही. त्या ताटात जेवण कसे मिळेल याची चिंता करणारे आहोत, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या