युतीसाठी भाजप प्रयत्नशील- सुधीर मुनगंटीवार

35

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप कायम प्रयत्नशील राहील असे भाजप नेते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. तूर्तास तरी या विषयावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा सुरू नसल्याचा दावाही त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात भेट ठरली होती का असा सवाल मंत्रालयात पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला होता. त्यावर आपण युतीसंदर्भात नाही तर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना भेटणार होतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. युतीसाठी आम्ही प्रयत्नशील असलो तरी शिवसेनेला वेगळे लढायचे असेल तर भाजप २८८ जागा स्वबळावर लढवेल असेही ते म्हणाले. युती ही तर्कावर आणि आकडेवारीवर होते असे ते पुढे म्हणाले.

नाणारबाबतही पत्रकारांनी यावेळी छेडले असता मुनगंटीवार म्हणाले की, नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नसेल तर गुजरातला आंदण द्यायचा का, असा सवाल करतानाच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होईल हेसुद्धा जाणून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या