भाजपच्या कल्याण शहाराध्यक्षकांनी तलवारीने केक कापला

30

सामना ऑनलाईन। कल्याण

भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचे उघड झाले आहे. म्हात्रे तलवारीने केक कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे म्हात्रे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

१ मेला म्हात्रे यांचा वाढदिवस असतो. यामुळे सोमवारी रात्री म्हात्रे यांच्या गौरीपाडा येथील घराबाहेर उत्साही कार्यकर्ते, मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी म्हात्रे यांनी सुरीऐवजी तलवारीने केक कापला. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ काहींनी सोशल साईटवर पोस्ट केला. तलवारीने केक कापल्याने म्हात्रेंवर चहूबाजूक़डून टीका होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या