भाजप नेत्याने पक्ष कार्यालयातच बायकोच्या कानाखाली मारली

2315

भाजपच्या दिल्लीतील एका नेत्याने त्याच्या पत्नीला पक्ष कार्यालयातच सर्वांदेखत कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आझाद सिंग असे त्या नेत्याचे नाव असून त्यांच्या पत्नी सरिता चौधरी या दक्षिण दिल्लीच्या माजी महापौर आहेत. या पतीपत्नीमध्ये सध्या वाद सुरू असून त्यांनी घटस्फोटासाठी देखील अर्ज केला आहे.

शुक्रवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला आझाद सिंग व सरिता चौधरी हे दोघेही उपस्थित होते. जावडेकर यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर ते दोघे कार्यालयाबाहेर आले असता त्यांच्यात वाद झाला व त्यानंतर सिंग यांनी सरिता यांना कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आझाद सिंग यांना पक्षातून निलंबित केले आहे. ‘महिलांच्या सन्मानाशी आम्ही तडजोड करू नका. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही समिती स्थापन केली असून आरोपी व्यक्तीची जिल्हा अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे’, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या