भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, ममता बॅनर्जींची तुलना किंम जोंग उन सोबत केली

भाजपच्या नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना हुकुमशहा किंम जोंग उनसोबत केली आहे. कोलकात्यात भाजपच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार घडला होता, त्यावरून या भाजप नेत्याने टीका केली आहे.

केंद्रीय गिरीराज सिंह म्हणाले की, लोकशाही माननारी मुख्यमंत्री असे विधान करूच शकत नाही. उत्तर कोरियाचे हुकुमशाह यांच्या कोणी विरोधात बोलले की त्यांना खपत नाही, हीच प्रवृत्ती ममता बॅनर्जी यांची आहे. आपल्याविरोधात कुणी काही बोललेलं बॅनर्जी यांना चालत नाही असे सिंह म्हणाले.

कोलकात्यात महिला डॉक्टरवर हॉस्पिटलच्याच कर्मचाऱ्याने बलात्कार करून खुन केला होता. यावरून संपूर्ण राज्यात आणि देशात गदारोळ झाला होता. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी या घटनेविरोधात आंदोलनं केली होती. भाजपनेही पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारला होता. पण या बंदला हिंसक वळण लागलं होतं. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती. भाजपने बंद पुकारून राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला आहे.