मोदी मोठे नेते, छोटे मोठे पक्ष बाहेर पडल्याने फरक नाही पडत- भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय

kailash-vijayvargiya

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत, त्यामुळे अकाली दल सारखे छोटे मोठे पक्ष सोडून गेले तर काही फरक पडत नाही असे वक्तव्य भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. तसेच अकाली दलने शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत दबावाचे राजकारण केल्याचाही आरोपही त्यांना केला.

शेतकरी विधेयकावरून अकाली दलच्या हरसिमर कौर यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच अकाली दल एनडीएतून बाहेरसुद्धा पडली. यावर भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय म्हणाले की अकाली दलने शेतकर्‍यांना समजून सांगायला पाहिजे होते की यात त्यांचेच हित आहे. शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबतीत दबावाचे राजकारण केले जात आहे. अकाली दलने साथ सोडल्यामुळे काही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. त्यामुळे अकाली दल सारखे छोटे मोठे पक्ष बाहेर पडले तरी काही फरक पडत नाही.” असे असले तरी अकाली दल आमचा जुना मित्र पक्ष आहे म्हणून त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे असेही विजयवर्गीय म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या