‘साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

salmam-home

सामना ऑनलाईन । इंदूर

काळवीट शिकारप्रकरणी अटक करण्यात आलेला सलमान खानला २ दिवसात जामीन मंजूर झाला आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले. आता भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सलमान खानवर गंभीर आरोप केला आहे. सलमान खान पैशांच्या बळावर साक्षीदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप त्यांनी केला आहे. इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, ‘सलमान खानला अटक केल्यापासून टीव्हीवर सगळीकडे त्याच्याच बातम्या दाखवल्या जात आहे. सलमानने कोणते पुण्याचे काम केलेले नाही, कोणते चांगले काम केलेले नाही. त्याने काळवीटाची शिकार केली आहे आणि याबद्दल त्याला शिक्षाही सुनावण्यात आली आहे. बिश्नोई समाजाचे कौतुक करताना ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांकडे २ एकर, ५ एकर शेती आहे त्यांनी सलमानविरोधात साक्ष दिली. साक्ष बदलण्यासाठी सलमान खान नोटांची बंडलं घेऊन त्यांच्याकडे गेला होता, परंतु शेतकरी आपल्या साक्षिवर टिकून राहिले आणि विकले गेले नाहीत.’

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने सलमान खानला ५ वर्षाचा तुरुंगवास आणि १० हजारांचा दंड सुनावला होता. दोन दिवस तुरुंगात काढल्यानंतर शनिवारी सलमानला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

वादाचे जुने नाते
यापूर्वीही विजयवर्गीय आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आले होते. वडोदरा रेल्वे स्थानकावर बॉलिवूड स्टार शाहरूख खानला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. यात एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणावर बोलताना विजयवर्गीय यांनी शाहरूखची तुलना अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीमसोबत केली होती.

एक प्रतिक्रिया

  1. ह्या बातमीच्या संदर्भात मला व्हाॅॅॅट्स अप संदेश माध्यमात खालील अर्थाचा एक संदेश आला आहे,”सलमानला जर जामीन मंजूर झाला नसता तर माझा पैशावरील विश्वास उडाला असता”