पूर्वी नक्षलवादी होते मिथुन चक्रवर्ती, घोटाळ्यात नाव आल्याने सोडले होते राजकारण

सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. कोणे एके काळी नक्षलवादी असलेल मिथून यांना डाव्या विचारांची भुरळ पडली होती. मिथूनदा तृणमूलचे राज्यसभेचे खासदारही होती. घोटाळ्यात नाव आल्याने त्यांनी राजकारणही सोडले होते.

मिथून चक्रवर्ती यांचा जन्म कोलकाता येथे 16 जून 1950 साली झाला होता. तरुणपणी मिथून यांना डाव्या विचारासरणीची भूरळ पडली होती. इतकी की ते नक्षलवादी झाले होते. नंतर त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि ते नक्षलवादी चळवळ सोडून आई वडिलांकडे आले. पुण्यातील एफ़टीआयआय मधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.

2011 साली तृणमूल काँग्रेस पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हा मिथून आणि ममता बॅनर्जी यांची मैत्री होती. बॅनर्जी यांनी मिथून यांना तृणमूलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. मिथून यांनीही हसत हसत ते स्विकारले. 2014 साली तृणमूलच्या तिकीटावर मिथून राज्यसभा खासदार झाले होते. पण अडीच वर्षाच्या कार्यकाळात संसदेत ते  फक्त तीन दिवस हजर होते.

2015-16 साली शारदा चिटफंड घोटाळ्यात मिथून यांचे नाव आले. तेव्हा 2016 मध्ये त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून मिथून राजकारणापासून अलिप्त होते.

मिथून चक्रवर्ती शारदा कंपनीचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडेरे होते. या घोटाळ्याप्रकरणी इडीने त्यांची चौकशीही केली होती. तेव्हा मिथून यांनी 1 कोटी 20 लाख रुपये परत दिले होते आणि या घोटाळ्यात आपल्याला पडायचे नाही असे म्हटेल होते.

आता मिथून भाजपमध्ये सामील झाले असून त्यांच्या राजकारणाची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. जेव्हा मिथून यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली तेव्हापासूनच ते भाजपमध्ये सामील होणार अशी चर्चा रंगली होती.  जेव्हा शनिवारी भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी मिथून यांची भेट घेतली तेव्हा चित्र स्पष्ट झाले.

तृणमूलमध्ये सामील होण्यापूर्वी मिथून हे डावे विचारसरणीचे समजले जात होते. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुभाष चक्रवर्ती आणि त्यांचे जवळचे संबंध होते. तरुणपणी मिथून स्वतःला डावे म्हणायचे. जेव्हा त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश घेतला तेव्हा अनेकांनी भुवया उंचाअल्या. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या