विमानात बसलो तेव्हा मंत्री होतो, उतरलो तेव्हा माझं मंत्रीपदच गेलेलं… भाजप नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

shahnawaz-hussain

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला दे धक्का देत भाजप जदयूचे सरकार पाडले. त्यानंतर नितीश कुमारांनी राजद व काँग्रेससोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं. नितीश कुमारांनी अचानक दिलेल्या या धक्क्याने भाजपचे नेतेही हादरले. यावर बिहारचे माजी उद्योग मंत्री शहानवाझ हुसेन यांनी मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.

शहनवाझ हुसेन हे नुकतेच बिहारचे उद्योग मंत्री या नात्याने दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले होते. ते बिहारमधून विमानात बसले तेव्हा तोपर्यंत बिहारमधलं सरकार होतं. मात्र दिल्लीत ते उतरले तोपर्यंत नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला होता. मात्र शहनवाझ हुसेन यांनी ठरल्याप्रमाणे तो कार्य़क्रम पार पडला.

त्या कार्यक्रमानंतर बिहारच्या सत्ताबदलाबाबत एका पत्रकाराने शहनवाझ हुसेन यांना विचारले असता ते म्हणाले की ”जेव्हा मी विमानात बसलो तेव्हा मी बिहारचा मंत्री होतो व जेव्हा विमान लँड केलं तेव्हा कळलं माझं मंत्रीपदच गेलंय. आमचं सरकार कोसळलं’, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

बिहारमध्ये भाजपचा बाजार उठला असून जदयूचे अध्यक्ष, मुख्यमंत्री नितीशकुमार कमळाबाईंशी घटस्फोट घेतला आहे. जदयू-भाजप युती तुटली असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजद व काँग्रेससोबत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे.