मास्क न घातल्याने अडवले, भाजप नेत्यांची पोलिसांना मारहाण

2253

मास्क न घातल्याने अडवून विचारणा केली या कारणाने एका भाजप नेत्याने पोलिसाला मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे ही घटना घडली आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसी येथील सुंदरपूर चौकीजवळ ही घटना घडली आहे. हा परिसर कोरोना हॉटस्पॉट असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला अशीच नाकाबंदी सुरू होती. तेव्हा काही बाईकस्वार तिथे आले. त्या बाईकवर भाजपचा जिल्हा परिषद सदस्य विकास पटेल होता. विकास याने मास्क न लावल्याने पोलिसाने त्याला हटकलं आणि अडवून मास्क लावायला सांगितलं.

याचा राग येऊन विकास पटेल याने पोलिसाशी बाचाबाची सुरू केली. बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. ही हाणामारी सुरू असताना तिथे भाजपचा अन्य एक जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र पटेल आणि त्याचा भाऊ बिंदू पटेल काही जणांसोबत तिथे हजर झाले. त्यांनीही पोलिसांना मारायला सुरुवात केली. सुरेंद्र आणि बिंदू यांनी पोलिसांना शिवीगाळही केली.

या प्रकरणी विकास, सुरेंद्र आणि बिंदू या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळ आणणे, पोलिसांना मारहाण करणे असे आरोप आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या