ओवैसींच्या तोंडी दहशतवादी मसूदची भाषा, म्हणे भाजपचे कश्मिरच्या जमिनीवर प्रेम

1504

कलम 370 हटवल्यानंतर हिंदुस्थानमधील विरोधी पक्षांचा आणि पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने हिंदुस्थानवर टीका करत पंतप्रधान मोदी हिंदू भांडवलादारांचे हित साधणार अशी गरळ ओकली होती. एमआयएम या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही अशीच भाषा वापरत भाजपला कश्मिरी जनतेबद्दल जिव्हाळा नसून त्यांना कश्मीरच्या जमिनीत रस आहे असे अकलेचे तारे तोडले आहेत.

दहशतवादी मसूद अझहर म्हणाला होता की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कश्मीरमधील जमीन हिंदू भांडवलदार अंबानी, अदानी आणि मित्तल यांना देणार आणि नफा कमावणार.”

अशाच प्रकारचे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे. ओवैसी म्हणाले की, “या सरकारचे कश्मीरवर प्रेम आहे परंतु कश्मीरी जनतेवर नाही. त्यांचे कश्मीरच्या जमिनीवर प्रेम आहे परंतु कश्मीरच्या नागरिकांवर नाही. त्यांना सत्तेत रहायाचे आहे पण ते कायम सत्तेत राहू शकत नाही” अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच माजी पंतप्रधान नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडे जी राजकीय दुरदृष्टी होती ती  दुरदृष्टी  पंतप्रधान मोदींकडे नाही असे ओवैसी म्हणाले. नेहरू आणि पटेल यांनी देशहिताला प्राधान्य देत निर्णय घेतले.  मोदी म्हणतात की ते श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार पुढे चालवात आहेत. परंतु मुखर्जी यांनी कलम 370 ला पाठिंबा दिला होता असा अजब दावाही ओवैसी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या