भाजपात औसा का तौसा; निलंगेकरांचा औसात रास्ता रोको

640

भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच नाराजांनी बंडाचे निशाण फडकवण्यास सुरुवात केली. पहिली ठिणगी पडली ती औसा येथे आणि नंतर हे लोण इतरत्र पसरले. त्यामुळे भाजपमध्ये ‘औसा का तौसा’ स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना लातूरमधील औसा मतदारसंघातून देण्यात आलेल्या उमेदवारीच्या विरोधात पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे भाऊ अरविंद यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला तर एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ लेवा पाटीदार समाज आक्रमक झाला असून निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमध्ये नाराजीला तोंड द्यावे लागत आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याने औसा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते पद्धतशीरपणे बांधणी करत असताना पालकमंत्री निलंगेकर यांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. युतीत ही जागा भाजपला सुटल्यानंतर ‘आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पीए नको तर भूमिपुत्र द्या’ अशी मागणी करत अभिमन्यू पवार यांच्या विरोधात अरविंद पाटील-निलंगेकर व स्थानिक भाजप नेत्यांनी बंड पुकारल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

माझं काय चुकलं? खडसेंची वेदना

गेली 40 कर्षे प्रामाणिकपणे काम करूनही आपल्याला असे का कागवण्यात आले? माझं काय चुकलं, माझा गुन्हा तरी काय? आपल्या विरोधात कोणी विष पसरकले याची विचारणा करणार असल्याचे खडसे म्हणाले. इतर पक्षांमधून आपल्याला वेगवेगळी प्रलोभने आली, मात्र कधीही पक्षाला दगा दिला नाही. प्रामाणिकपणे काम करूनही बाहेरच्यांनी केलेल्या आरोपांकरून आपली चूक नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर ठेकण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गडकरींच्या बंगल्यासमोर नाराजांचा तांडा

दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून माजी आमदार मोहन मते यांना उमेदकारी देण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या कोहळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धाव घेऊन नाराजी व्यक्त केली. नागपूर मध्यमधून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱया भाजपा शहराध्यक्ष प्रकीण दटके यांना डावलून आमदार किकास कुंभारे यांनाच पुन्हा उमेदकारी देण्यात आल्याने नागपूर भाजपात प्रचंड अस्वस्थता आहे. कामठी, काटोल, रामटेक येथून उमेदवारी मिळावी यासाठी काही नाराजांनी गडकरींची भेट घेतली.

लातूरमध्ये निलंगेकरांनी रस्ता रोखला

‘मुख्यमंत्र्यांचा पीए नको, भूमिपुत्र द्या’ अशी मागणी करत बुधवारी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले. यामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या.

तावडेंनी केले दादांकडे मन मोकळे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे कमालीचे अस्वस्थ असून पहिल्या यादीत आपले नाव का घेतले नाही अशी रुखरुख त्यांना लागली आहे. तावडे यांनी बुधकारी सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांची भेट घेऊन मन मोकळे केले. आपले काही चुकले का, तसेच दुसऱ्या यादीत तरी नाव येईल की नाही याची चाचपणी केली.

पाटलांच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत हमखास नाव असेल अशी खात्री बाळगून असणाऱ्या नेत्यांनी दुसऱ्या यादीत तरी नाव यावे यासाठी धाकपळ सुरू केली आहे. भाजप नेते विनोद तावडे, राज पुरोहित यांनी उमेदवारीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. लातूरमधील उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत प्रदेश अध्यक्षांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले.

आपली प्रतिक्रिया द्या