फक्त शेतकरीच आत्महत्या करत नाहीत, भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

22

सामना ऑनलाईन । भोपाळ

कर्जबाजारीपणामुळे देशभरात शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू असताना मध्य प्रदेशमधील भाजपचे मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर असंवेदनशील वक्तव्य केले आहे. पत्रकारांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याविषयी विचारले असता, फक्त शेतकरीच आत्महत्या करत नाहीत, अन्य लोकंही करतात. जे आत्महत्या करतात त्यांनाच त्याचे खरे कारण माहीत असते आपण सर्वजण फक्त अंदाज बांधत असतो, असे वादग्रस्त वक्तव्य पाटीदार यांनी केले आहे.

“कोण आत्महत्या नाही करत? व्यापारी आत्महत्या करतात, पोलीस आत्महत्या करतात, सगळ्याच क्षेत्रातील लोकं आत्महत्या करतात. फक्त आपल्या देशाची नाही तर सर्व जगाची ही समस्या आहे. जे आत्महत्या करतात त्यांनाच त्याचे खरे कारण माहीत असते आपण सर्वजण फक्त अंदाज बांधत असतो”, असे वादग्रस्त वक्तव्य पाटीदार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या