भाजप आमदाराचे डोके ठिकाणावर आहे काय? म्हणे covid योद्ध्यांना कामाच्या ठिकाणी थांबवा

3413

एकीकडे कोविडमधे योद्धे आपल्या जीवाची बाजी लावून लढत असताना दुसरीकडे या योद्ध्यांना कामाच्या ठिकाणी थांबवा कारण त्यांच्यापासून इतरांना लागण होऊ शकते असा अजब तर्क भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे भाजप आमदार यांचे डोके ठिकाणावर आहे काय असा सवाल केला जात आहे.

कामोठे, खारघर, कळंबोली आणि खांदा कॉलनी या भागात मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, वसई, विरार येथील नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. अनेक जण विविध ठिकाणी काम करत आहेत. नर्स डॉक्टर पासून ते अगदी साफ सफाई, मेडिकल, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, भाजीपाला, दूध पुरवठा आदी अत्यावश्यक क्षेत्रात बरेच जण काम करतात. या वैश्विक महामारीत स्वतःला व कुटुंबाला पणाला लावून ते अत्यावश्यक सेवेत झोकून देत आहेत. या कर्मचार्‍यांचे आत्मबल वाढवण्याऐवजी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा नतद्रष्टेपणा भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या कोविड सेवकांना कामाच्या ठिकाणी थांबवा त्यांच्यापासून इतर नागरिकांना कोरोना चा संसर्ग होऊ शकतो असा अजब दावा करत त्यांनी त्यांचा अपमान केला आहे. तसेच त्यांचे मनोबल खच्ची केले असून थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे

हिम्मत असेल तर मालमत्ता कर माफ करा
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून दाद मिळाली नाही म्हणून त्यांनी थेट पनवेल बंदचा इशारा दिला होता मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ठाकुरांच्या शहरातील हवा काढली ठाकूर यांच्या या वृत्ताबाबत पनवेलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पनवेल पालिकेत भाजपची सत्ता आहे हिम्मत असेल तर कोरोना रुग्ण आणि योद्ध्यांना पाच वर्षांचा मालमत्ता कर माफ करा असे आवाहन पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी करून प्रशांत ठाकूर यांना सणसणीत चपराक दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या