भाजप आमदाराची हत्या की आत्महत्या? लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

1492

पश्चिम बंगालमधील दिनाजपूरच्या हेमताबाद येथील बाजारपेठेत भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दावा केला आहे की ही आत्महत्या नसून आमदाराची हत्या करण्यात आली आहे. या संदर्भात प. बंगाल भाजपाने ट्वीट केले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये भाजपने दावा केला आहे की, “उत्तर दिनाजपूरची राखीव जागा असलेल्या हेमताबाद येथील भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रे यांचा मृतदेह त्यांच्या गावाजवळ बिंदल येथे लटकलेला आढळला होता. लोकांचे म्हणणे आहे की, प्रथम त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर लटकवण्यात आले.” तसेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला हाच त्यांचा गुन्हा असेही म्हटले आहे.
bengal-bjp-twit

आपली प्रतिक्रिया द्या