शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना भेटले आशीष शेलार

8401

भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी नरिमन पाँइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. मात्र क्रिकेट व अन्य काही विषयांच्या संदर्भात ही भेट असल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले.


राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार परतीच्या मार्गावर आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नकाब मलिक यांनी सोमवारी केले होते या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते.
चव्हाण सेंटरमध्ये आशिष शेलार व शरद पवार यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. ही भेट आटोपून शेलार खाली उतरले तेव्हा सेंटरच्या आवारातच त्यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्याशी झाली. सुप्रीया सुळे यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला. मात्र या भेटीच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले की, राजकारण सोडूनही भेटी होतात हाच राजस्थान व महाराष्ट्रात फरक आहे. त्या ठिकाणी एकाच पक्षातील लोक इतके भांडतात की भेटायलाही तयार होत नाही. पण महाराष्ट्रात विरोधी पक्षात असलेले लोकही सहजपणे भेटतात हाच महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या