भाजप आमदार नंदकिशोर उतरले मैदानात, मटणाची दुकानं बंद केली

bjp-mla-nand-kishore-gurjar

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर रविवारी गाजियाबादच्या लोनी विभागात पोहोचले. या दरम्यान त्यांनी ठिकठिकणी सुरू असलेली मटणाची दुकाने बंद केली. भाजप आमदार, पूजा कॉलनी विभागात मटणाच्या दुकानांच्या मालकांना धमकावताना पाहायला मिळाले, असे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच नंदकिशोर गुर्जर यांनी पोलिसांना बोलवून मटणाची दुकानं चालवणाऱ्या दुकानदारांना पोलिसांच्या हवाली केले.

आमदार गुर्जर यांना याभागातील मटणाची दुकानं खुली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रविवारी आमदार या विभागात दाखल झाले आणि दुकानदारांना मटणाची दुकाने बंद करण्यास सांगितले.

कारण विचारले असता लोनी, हिंडन एयर क्राफ्ट विभागा अंतर्गत येते. म्हणून मटणाची दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. लोनी येथे शासन व प्रशासन यांच्या छुप्या पाठबळावरच मटणाची अवैध दुकानं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच अधिकाऱ्यांना इशारा देखील दिला की अशा प्रक्रारे मटणाचा अवैध कारभार खपवून घेतला जाणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या