मनाई असतानाही आमागड किल्ल्यावर झेंडा फडकवला; भाजप खासदार ताब्यात

राजस्थानातील जयपूरचे भाजप खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी मनाई आदेश असतानाही आमागड किल्ल्यावर झेंडा फडकवला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मीणा यांना किल्ल्यावर पूजा करून मीणा समाजाचा झेंडा फडकवायचा होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना किल्ल्यावर जाण्यासाठी त्यांना मनाई केली. तसेच किल्ल्यात जाण्यासाठी नागरिकांना मनाई आदेश जारी करण्यात आले होते.

मनाई आदेश असतानाही भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी किल्ल्यात प्रवेश करत झेंडा फडकवल्याने राजकीय वाद पेटला आहे. याआधी काँग्रेसचे आमदार रामकेश मीणा यांनी यांनी आमागड किल्ल्यावरील भगवा झेंडा फाडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रविवारी किरोडीलाल मीणा यांनी किल्ल्यात प्रवेश करत मीणा समाजाचा झेंडा फडकवला आहे. या घटनांमुळे वातावरण तापले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी किरोडीलाल मीणा यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी अडवण्यापूर्वीच मीणा यांनी किल्ल्यात प्रवेश करत मीणा समजाचा झेंडा फडकविला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत झेंडा फडकवल्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. तसेच पोलिसांना आमागड किल्ल्यावर आपल्याला अटक केल्याचे म्हटले आहे.

राजस्थानात मीणा समाजातील काही गट हिंदू समुदायाशी संघर्ष करत आहे. मीणा समुदायाची वेगळी ओळख असून ते हिंदू नाहीत, असा दावा या गटाने केला आहे. काँग्रेस आमदार आणि मीणा समुदायाचे नेते रामकेश मीणा यांनी काही दिवसांपूर्वी किल्ल्यावरील भगवा झेंडा फाडल्य़ाचे सांगण्यात येते. या घटनेनंतर वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. वातावरण तापत असल्याने पोलिसांनी मनाई आदेश जारी करत या किल्ल्यावर प्रवेशासाठी नागरिकांना मनाई केली होती. मात्र, पोलिसांची नजर चूकवत किरोडीलाल मीणा यांनी रविवारी किल्ल्यात प्रवेश केला आणि मीणा समाजाचा झेंडा फडकवला. त्यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेत सुरक्षेसाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या